मद्यपी कारचालकाने नागरिकांना उडविले, सहा जण जखमी

सिडको : पुढारी वृत्तसेवा
भरधाव वेगात आलेल्या मद्यपी कारचालकाने ६ नागरिकांना उडविले. नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. अंबड येथील मोरे मळा, एकदंत नगर मार्गावर शनिवार (दि.११) रोजी सायंकाळी ७.३० ते ८ वाजेच्या सुमारास अपघाताची घटना घडली. यामध्ये एक ६ वर्षाची मुलगी किरकोळ जखमी झाली आहे.

अंबड येथे मोरे मळ्याकडून एकदंत नगर कडे जाणाऱ्या मार्गावर अपघात घडला. कारचालक वेगाने कार चालवीत असल्याने त्याने रस्त्यावरील ५ ते ६ नागरिकांना धडक दिली. नागरिकांना जखमी करत कारचालकाने चारचाकी पुढे नेली. त्यामुळे कारची नंबर प्लेट रस्त्यात पडली. त्यावरून उपस्थित असलेल्या नागरिकांनी अंबड पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात तक्रार दाखल केली. या अपघातामध्ये रंजना खेत्रे (३९), शिवण्या खेत्रे (६), उमाकांत पाटील (३२) यांच्यासह इतरही नागरिक जखमी झाले. त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. मद्यपी कार चालकावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा: