मनमाड-मालेगाव मार्गावर ट्रक कंटेनरच्या भीषण अपघातात एक ठार

Road accident

चांदवड : पुढारी वृत्तसेवा- तालुक्यातील दहेगाव शिवारातील मालेगाव-मनमाड रोडवर भरधाव येणाऱ्या ट्रकने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कंटेनरमधील एक जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी चांदवड पोलिसांत ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालेगाव-मनमाड रस्त्यावर मालेगावकडे वेगात जाणारा ट्रक (एमपी ०९, एचएच ५०५५) चालकाचे नियंत्रण सुटल्याने सुमोरून येणाऱ्या कंटेनरला (केए २५ सी ९३९०) धडक दिली. या भीषण अपघातात कंटेनरमधील सुरेंदर जाटगिरी (४५, रा. खरोली ता. शिवरामपूर, बिहार) हा जागीच ठार झाला, तर गणेश आनंत पतर हा जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनेबाबत संतोष शिवगोंडा पाटील (३२, रा. शिवराई ता. गंगापूर, संभाजीनगर) याने चांदवड पोलिसांत फिर्याद दिली आहे.

हेही वाचा –

The post मनमाड-मालेगाव मार्गावर ट्रक कंटेनरच्या भीषण अपघातात एक ठार appeared first on पुढारी.