जळगाव : पुढारी वृत्तसेवा– जळगाव जिल्ह्यात पुरुषांपेक्षा महिला मतदान चार टक्क्याने कमी होते. यामध्ये सर्वाधिक जळगाव आणि पुसद शहरामध्ये महिला मतदारांची संख्या कमी असते. लोकसभेत महिलांचे प्रमाण जास्त असते, मात्र विधानसभा आणि नगरपालिका यामध्ये महिला मतदारांची संख्या खूप कमी असते. जळगाव आणि भुसावळ या दोन जिल्ह्यांमध्ये महिला मतदानाची नोंदणी कमी असल्याने त्यावर फोकस करणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
मतदार यादी पुनर्परीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन मतदान यादी प्रसिद्ध झाल्याची माहिती दिली. यामध्ये गेल्या वर्षीपेक्षा चार टक्क्यांनी मतदानाची वाढ झालेली आहे. मात्र, यामध्ये महिला आणि तरुण मुली यांची संख्या कमी असल्याचे त्यांनी सांगितले. 75 हजार 283 नवीन मतदार जोडले गेलेले आहेत, तर सर्वाधिक मतदान यादीमधून नावे कमी झाल्याची संख्या भुसावळ विधानसभा क्षेत्रातील आहे.
मतदान यादीमध्ये मतदारांचे दोन ठिकाणी फोटो असलेल्यांची संख्या 23 हजार 644 दिसून आली आहे. तर नाव, पत्ता आणि वय यासारखे सारखे असल्याचे प्रमाण 30 हजार आहे. त्यामधील अनेक नावे कमी करण्यात आली आहेत.
जिल्ह्यात मतदानासाठी 3564 मतदान केंद्र असणार आहेत. या ठिकाणी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार सर्व सुख-सुविधांसाठी साडेपाच कोटी रुपयांचे निधी डिपीडीसीमधून मंजूर करण्यात आले आहे. या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील 16 ठिकाणी नेटवर्क उपलब्ध नाही. त्यामध्ये रावेर आणि चोपडा हे दोन तालुकांमध्ये सर्वाधिक मतदान केंद्र आहेत. ज्या ठिकाणी नेटवर्क नाही आहे, येथील प्रस्ताव बीएसएनएलला गेले आहेत.
निवडणूक शाखेचे काम चांगले असूनही यावर्षी निवडणूक विभाग आयोगाकडून देण्यात येणाऱ्या पुरस्कार जळगाव जिल्हाला मिळाला नाही. याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी खंत व्यक्त केली. पुढील वर्षी यापेक्षाही चांगले काम करून निवडणूक आयोगाकडून दिला जाणारा पुरस्कार जळगाव जिल्हा मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा :
- Transfer News : ‘मलईदार’ हवेलीचा ‘मान’करी कोण होणार ?
- ICC ODI Team : आयसीसीचा सर्वोत्कृष्ट वनडे संघ जाहीर! रोहित शर्मा कर्णधार
- Ram Lalla Darshan: अयोध्येत अडीच ते तीन लाख भाविकांनी घेतले रामलल्लाचे दर्शन
The post महिला मतदारांवर करणार फोकस : जिल्हाधिकारी appeared first on पुढारी.