माजी नगरसेवकाच्या कुटुंबावर धारदार शस्त्रांनी हल्ला

क्राईम न्यूज pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा –   रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्यांस रोखल्यामुळे टोळक्याने माजी नगरसेविकेच्या पतीसह त्यांच्या भावावर धारदार शस्त्राने वार केले.

अल्पवयीन मुलांचे एक टोळके रस्त्यात वाढदिवस साजरा करत असताना आरडाओरडा करत होते. या टोळक्यावर कारवाई करण्यासाठी स्थानिकांनी नगरसेवक म्हणून खर्जुल यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे टोळक्याला समज देण्यासाठी गेलेल्या खर्जुल कुटुंबियांवरच या टोळक्यानं हल्ला केल्याची घटना घडली आहे.

नाशिकरोड पोलिसांच्या हद्दीत खर्जुल मळा परिसरात सोमवारी (दि.२७) रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या हल्ल्यात माजी नगरसेविका जयश्री खर्जुल यांचे पती नितीन खर्जुल, त्यांचे बंधू किरण खर्जुल व दीपक खर्जुल हे जखमी झाले आहेत. खर्जुल बंधू यांच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. इतर दोघांची प्रकृती मात्र मध्यम आहे.

हेही वाचा: