नाशिक : पुढारी वृत्तसेवा– आर्थिक कारणावरून एकास शिवीगाळ करीत मारहाण करणाऱ्यास न्यायालयाने चांगल्या वर्तवणूकीचा बॉन्ड आणि ज्यास मारहाण केली त्यास १ हजार रुपयांची नुकसान भरपाई अशी शिक्षा सुनावली आहे. २६ मार्च २०१५ रोजी दुपारी तीनच्या सुमारास नाशिकरोड येथील अनुराधा टॉकिजच्या बाजुला हा प्रकार घडला होता.
राजू खयलीराम विंग (४९, रा. द्वारका) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. राजु यांनी शरद रामप्रसाद कातकाडे यांना शिवीगाळ करीत चहाचा काचेचा ट्रे मारून दुखापत केली होती. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात राजु विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन सहायक उपनिरीक्षक हुसेन शेख यांनी तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे अॅड. सायली गोखले यांनी युक्तीवाद केला. नाशिकरोड येथील प्रथमवर्ग न्यायाधीश पी. एच. जोशी यांनी राजुस शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून अंमलदार गौरव साळवे यांनी कामकाज केले.
हेही वाचा :
- कोल्हापूर परिक्षेत्रातील २८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
- Dhule News : मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी गोयल
- Tharla Tar Mag! series : हनीमून नव्हे तर फ्रेंडमून; हनीमूनसाठी सायली-अर्जुन माथेरानला
The post मारहाण करणाऱ्यास चांगल्या वर्तवणूकीचा 'बॉन्ड' appeared first on पुढारी.