मालेगावात गॅंगवार, भांडणाची कुरापत काढून दोघांच्या दिशेने गोळीबार

Firing

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा- जुन्या भांडणाची कुरापत काढून संगमेश्‍वर भागातील दोघा तरुणांवर प्राणघातक हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार सोमवारी (दि.6) रात्री मध्यरात्री घडला. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोमीन अराफत समिनउल्ला (29, रा. जगताप गल्ली) हा मित्र असर अंजुम यांच्यासह मित्र गणेश वडगेच्या घरून मारुती चौकात येत असताना संशयित आरोपी हर्षल देविदास जाधव, विवेक परदेशी, भैय्या जाधव , मयूर बडोगेसह तीन ते चार तरुण एका कार मधून आले. त्यांनी मोमीन व असर या दोघांवर जाधव याने हातातल्या बंदुकीने त्यांच्या दिशेने गोळीबार केला. जीव मुठीत घेऊन मोमीन व असर दोघे तेथून पळाले. या धावपळीत असर यांच्यावर हल्लेखोर तरुणांनी कोयत्याने वार करून जखमी केले. यानंतर हल्लेखोर कारमध्ये बसून मोसम पुल परिसराकडे पसार झालेत. हा सगळा थरार सीसीटिव्ही कॅमेरेत कैद झाला.

जखमी असर यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने मात्र संगमेश्वर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मोमीन याच्या फिर्यादीवरून छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस संशयित आरोपींचा शोध घेत आहेत. संगमेश्वर भागात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रकार वाढले आहेत. मागील महिन्यात याच भागात एका तरूणाचा खून झाल्याची घटना घडली असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा-