मराठा आंदोलकांनी सरकारचा घातला दशक्रिया विधी

सरकारचा दशक्रिया विधी,www.pudhari.news

येवला(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या लढ्याला 40 ते 50 दिवस उलटले असून राज्यभरामध्ये ठिकठिकाणी मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन सुरू झाले आहे. जरांगे पाटील यांनी देखील पुन्हा उपोषण सुरु केले आहे. ठिकठिकाणी गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी देखील करण्यात येत आहे.   (Maratha Reservation)

येवल्यातील सकल मराठा समाज ठिय्या आंदोलन समितीच्या वतीने तहसील कार्यालय येथे गेल्या 40 दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्याचबरोबर गेल्या बारा दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन देखील सुरू आहे. मात्र तरी देखील सरकारला जाग येत नसल्यामुळे आंदोलन समितीच्या वतीने सरकारचे दशक्रिया घालून मुंडन आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी या आंदोलन समितीचे संजय सोमासे, जालिंदर मेंढकर, निंबाजी फरताळे, गोरख संत, विजय मोरे, शिवलाल धनवटे, रवी शेळके, गोरख सांबरे आदींनी मुंडन आंदोलन केले असून शासनाने आताही अंत पाहू नये अशी मागणी याप्रसंगी आंदोलकांनी केली आहे.

हेही वाचा :

The post मराठा आंदोलकांनी सरकारचा घातला दशक्रिया विधी appeared first on पुढारी.