मालेगाव बाजार समितीच्या सभापती पदी डॉ. अद्वय हिरे

डॉ. अद्वय हिरे-पाटील www.pudhari.news

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे तर उपसभापतीपदी विनोद चव्हाण यांची अविरोध निवड झाली.

बाजार समितीत निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र शेळके यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.२५) नवनिर्वाचित संचालक मंडळाची विशेष सभा पार पडली. त्यांना संजय मोरे यांनी सहाय्य केले. डॉ. हिरे यांच्या कर्मवीर भाऊराव हिरे पॅनलने १४ जागा आणि माजी सभापती बंडुकाका बच्छाव समर्थक एका संचालकासह निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले, परंतु सत्ता संघर्षात राज्यातील राजकीय घडामोडीला साजेसे डावपेच होण्याची अटकळ बांधली जात होती. प्रत्यक्षात तसे घडले नाही. पालकमंत्री दादा भुसे यांच्या आपलं पॅनलचे तीन उमेदवार विजयी झाले होते. त्यापैकी एक ही संचालक बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.

निवडप्रक्रिया अविरोध होताच कर्मवीर पॅनलचे संचालक डॉ. उज्जैन इंगळे, रवींद्र सूर्यवंशी, संदीप पवार रवींद्र मोरे आदी संचालकांसह समर्थकांनी जल्लोष केला.

हेही वाचा :

 

The post मालेगाव बाजार समितीच्या सभापती पदी डॉ. अद्वय हिरे appeared first on पुढारी.