नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सुरगाणा तालुक्यातील उंडोहळ पाड्यावरील महिलांना शनिवारी (दि. १३) ‘मिशन हर घर जल २४’ अंतर्गत २०० रोलिंग ड्रमचे वाटप करण्यात आले. हे ड्रम विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून वितरीत करण्यात आले. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात महिलांच्या डोक्यावरील हंड्याचा भार कमी झाला आहे.
यंदा उन्हाची दाहकता अधिक आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाईने जनता हैराण झाली आहे. जिल्ह्याच्या दुर्गम आदिवासी भागातील महिलांना पाण्यासाठी अनेक मैल डोक्यावर हंडा घेत पायपीट करावी लागते आहे. हीच समस्या लक्षात घेत स्वयंशक्ती-स्त्री उद्यमी फाउंडेशन, रोटरी कल्ब ऑफ नाशिक नॉर्थ, इनरव्हील क्लब ॲाफ जेननेक्स्ट, नाशिक व ऋणमुक्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन हर घर जल-२४’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमासाठी समाजातील विविध घटकांनी दिलेल्या देणगीतून उंडोहळ येथे रोलिंग ड्रमचे वितरण झाले. उपक्रमाबद्दल स्थानिकांनी मदत करणाऱ्या संस्थांचे व समाजाचे आभार मानले.
उपक्रमप्रसंगी स्त्री उद्यमी फाउंडेशनच्या अध्यक्षा दीपाली चांडक, उपाध्यक्षा स्वाती शाह, रोटरी क्लबचे सदस्य अगस्त्य मुनीम, गीता पिंगळे, इनरव्हील क्लब जेननेक्टच्या संध्या साखरे, मोनल मोहता, रोटरी क्लब ऑफ ठाण्याचे अध्यक्ष दीपक अगरवाल, इनरव्हील क्लब ऑफ ठाणे शायनिंग स्टारच्या अध्यक्षा उज्ज्वला अगरवाल, जलपरिषदेचे देवीदास कामडी यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
हेही वाचा:
- भामा आसखेडमधून आवर्तन सुरूच; कमी पाणीसाठ्यामुळे खेडमधील शेतकर्यांचा आक्रोश
- Janhvi Kapoor-Rajkummar Rao : जान्हवी कपूरसोबत नव्या चित्रपटात रोमान्स; राजकुमारने लिहिलं..
- Byju’s इंडियाचे CEO अर्जुन मोहन यांचा राजीनामा, रविंद्रन यांनी पुन्हा घेतली जबाबदारी
The post 'मिशन हर घर जल-२४' अंतर्गत उंडोहळला २०० रोलिंग ड्रम वाटप appeared first on पुढारी.