मोठी बातमी ! भोसरी भूखंड प्रकरणात खडसेंसह पत्नी, जावयाला जामीन मंजूर

मंदाकिनी खडसे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- भोसरी येथील कथित भूखंड गैरव्यवहार प्रकरणात आमदार एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी व जावई यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

एकनाथराव खडसे हे महसूलमंत्री असतांना त्यांच्या पत्नी आणि जावई यांनी भोसरी येथील खरेदी केलेला भूखंड वादाच्या भोवर्‍यात सापडला होता. या प्रकरणामुळे खडसेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणी त्यांची इडीने चौकशी देखील केली होती. तर याच प्रकरणात त्यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी यांना सुमारे दोन वर्ष कारागृहात काढावे लागले होते.

दरम्यान, या कथित भूखंड घोटाळा प्रकरणी ११ ऑक्टोबर २०२३ रोजी आरोपींवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. यात २४ नोव्हेंबर २०२३ ला खडसे यांच्यासह दोघांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. यानंतर आता न्यायालयाने अंतरिम जामिनाच्याच अटी -शर्तींवर खडसे यांच्यासह पत्नी मंदा खडसे आणि जावई गिरीश दयाराम चौधरी यांना नियमीत जामीन मंजूर केला आहे. यामुळे एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

The post मोठी बातमी ! भोसरी भूखंड प्रकरणात खडसेंसह पत्नी, जावयाला जामीन मंजूर appeared first on पुढारी.