नाशिक : पुढारी वृत्तसेवा; राज्यपाल रमेश बैस हे शुक्रवारी (दि.५) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. बैस यांच्या हस्ते काळाराम मंदिरात आरती व पूजाविधी केली जाणार आहे. त्यामुळे मंदिर परिसरात सर्वाधिक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
राज्यपाल रमेश बैस हे शुक्रवारी सकाळी नाशिकला येतील. शहर पोलिस मुख्यालयाच्या हेलिपॅडवर उतरल्यानंतर बैस हे पंचवटीतील काळाराम मंदिरात आरती व पूजाविधीसाठी जाणार आहेत. त्यानंतर ते त्र्यंबकेश्वर रोडवरील संदीप फाउंडेशन येथे नियोजित कार्यक्रमासाठी जाणार आहेत. राज्यपाल बैस यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ४५० पोलिसांचा बंदोबस्त शहरात तैनात असणार आहे. काळाराम मंदिर परिसरात पोलिस अधिकारी-कर्मचारी असा सुमारे १५० जणांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच शीघ्रकृती दलासह राखीव तुकडीही सज्ज ठेवण्यात आली आहे.
बंदोबस्ताचे नियोजन
पोलिस उपायुक्त – १
सहायक पोलिस आयुक्त – ३
पोलिस निरीक्षक – ३
सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक – २५
पोलिस कर्मचारी – ४५०
राखीव दलाची तुकडी -१
शीघ्रकृती दलाची तुकडी – १
हेही वाचा :
- सांगली : कुपवाड येथे दुचाकींच्या धडकेत दोन युवकांचा मृत्यू
- Ajit Pawar : ज्येष्ठांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावे : अजित पवार
The post राज्यपाल आज नाशिक दौऱ्यावर, साडेचारशे पोलिसांचा बंदोबस्त appeared first on पुढारी.