रामकुंडावर भाविकाचा मोबाइल, रोकड लंपास

मोबाईल चोरी

नाशिक : रामकुंड परिसरात गंगापुजन करण्यासाठी गेलेल्या महिला भाविकाकडील मोबाइल व रोकड असा ४ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. याप्रकरणी सिद्धी वाघमारे (रा. कल्याण) यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे. सिद्धी या शनिवारी (दि.३) रात्री गंगा पुजन करत असताना चोरट्याने मोबाइल, रोकड व महत्वाची कागदपत्रे चोरून नेली.

दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना अटक

नाशिक : दुचाकी चोरी करणाऱ्या दोघा संशयितांना पोलिसांनी पकडले आहे. शाहरुख सय्यद (२४, रा. अमृतधाम) व प्रविण पवार (२५, रा. निलगिरी बाग) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. मनोहर आहेर (३६, रा. वृदांवन नगर) यांच्याकडील दुचाकी चोरट्याने ३ ते ४ फेब्रुवारी दरम्यान चोरली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मनोहर यांनी आडगाव पोलिसांना कळवले. पोलिसांनी तपास करीत दोघा संशयितांना अटक केली आहे. दोघांकडून दुचाकीही जप्त केली आहे. दोघांविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रवाशाचे दागिने लंपास

नाशिक : महामार्ग बसस्थानकात बसमध्ये चढत असणाऱ्या महिला प्रवाशाच्या पर्समधून चोरट्याने ८० हजार रुपयांचे चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. कांता आरसुळे (रा. ठाणे) यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि.४) दुपारी एकच्या सुमारास नाशिक-कसारा बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी चोरट्याने दागिने लंपास केले. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा

The post रामकुंडावर भाविकाचा मोबाइल, रोकड लंपास appeared first on पुढारी.