विंचूर : पुढारी वृत्तसेवा- लासलगाव पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक न करता कोर्टात पाठवून मदत करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना विंचूर चौकातील पोलिस नाईक कैलास बिडगर यास लाचलुचपत प्रतिबंध विभागाने पकडले. पंचांसमक्ष दहा हजार रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडीअंती पाच हजार रुपये घेताना ते जाळ्यात आले.
तक्रारदार हे डोंगरगाव (ता. निफाड) येथील शेतकरी आहेत. त्यांच्याविरुद्ध पती-पत्नीसह मारहाण केल्याप्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात शनिवारी (दि.१८) गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा पोलिस नाईक बिडगर हे तपास करीत होते. अटकेची कारवाई न करता कोर्टात पाठवून मदत करण्यासाठी त्यांनी दहा हजारांची लाच मागितली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पथकाने सापळा रचला. याठिकाणी तडजोडीअंती पाच हजार रुपये स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली.
हेही वाचा –