लोकशाहीचा उत्सव : महारांगाेळीतून ‘जागर लोकशाहीचा’

महारांगोळी pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रीय विकास मंडळ, गुणगौरव न्यास व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमात तिसऱ्या दिवशी पाडवा पटांगण येथे महारांगोळी साकारली. आपल्या भारतीय लोकशाहीचे संवर्धन, जतन आणि संस्कृतीचे दर्शन हा उद्देश ठेवून यंदा जागर लोकशाहीचा अंतर्गत भरडधान्याच्या माध्यमातून ही महारांगोळी साकारली आहे.

सरकारने संयुक्त राष्ट्रसंघासह २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्य (मिलेट) वर्ष म्हणून घोषित केले होते. म्हणूनच त्या निमित्ताने मिलेट्स, श्रीअन्न, तृणधान्य यांचे आपल्या आहारातील महत्त्व वाढावे या हेतूने ही भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. तसेच या रांगोळीतून “राष्ट्रहितासाठी मतदान करा” हा संदेश देण्यात आला आहे. दोन दिवस महारांगोळी नाशिककरांना बघण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जास्तीत जास्त नाशिककरांनी प्रदर्शन बघण्यासाठी पाडवा पटांगणावर यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महारांगोळी pudhari.news

महारांगोळीची रचना नीलेश देशपांडे यांची आहे. तर महारांगोळी प्रमुख म्हणून आरती गरुड, तर महारांगोळी सहप्रमुख म्हणून सुजाता कापुरे आणि मयूरी शुक्ला नवले यांनी जबाबदारी पार पडली. महारांगोळीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी संजय पाटील, चंदूकाका सराफ, आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, जयवंत बिरारी, संजय देवरे, महेंद्र छोरिया आदी मान्यवर उपस्थित होते.

महारांगोळी pudhari.news

यंदा रांगोळीतील सहभागी महिलांसाठी तृणधान्य, भरडधान्य पाककला स्पर्धादेखील आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भारती सोनावणे प्रथम, सुप्रिया गोस्वामी यांनी द्वितीय, तर सुचेता हुदलीकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. या रांगोळीत वापरले गेलेले भरडधान्य हे पुढे निवडून, स्वच्छ प्रक्रिया करून मग ते गरजूंना वाटण्यात येणार आहे.

७५ बाय ७५ फूट महारांगोळी
१२०० किलो नाचणी
३०० किलो वरई
४०० किलो बाजरी
१०० किलो मूग
५० किलो कोदरा
४०० किलो ज्वारी
२०० किलो राळा
१०० किलो उडीद
२०० किलो मसूर
१०० महिलांचा सहभाग
चार तासांत साकारली महारांगोळी

हेही वाचा:

The post लोकशाहीचा उत्सव : महारांगाेळीतून 'जागर लोकशाहीचा' appeared first on पुढारी.