वसंत म्हणजे फुलांचा उत्सव …पक्ष्यांचा किलबिलाट.. फळांचा घमघमाट…आणि रानावनात आणि शहरात भटकंती करण्याचे दिवस.. वसंत म्हणजे फुलपाखरांना न्याहळन्याचे दिवस, रानमेवा खाण्याचे दिवस… वसंत म्हणजे नवी पालवी निरखण्याचे दिवस…वसंत म्हणजे रंगांचा उत्सव….वसंत म्हणजे वृक्षांची ओळख करून घ्यायचे दिवस..शहरात पळस, पांघारा, नीलमोहर, गिरिपुष्प, सावर, काटेसावर चांगलीच बहरली आहेत. पक्ष्यांचा किलबिलाट देखील वाढलाय. गंगापूर रोड, आनंदवली, गोविंद नगर, म्हसरूळ, नक्षत्र उद्यानात टिपलेले छायाचित्र.
जानेवारी ते मे पर्यंत बहरणारी काही वृक्ष ..
फेब्रुवारी: पांढरी सावर, वारस, मोह, पलस , कडुलिंब, टाबुबिया
मार्च: सफेद खैर, पिवळा करमळ, पांगरा, शिरीष, नाग चाफा
एप्रिल: आपटा, बेल, निलमोहर,
मे : तामण, तिवर, बहावा, कदंब , गुलमोहर, सीता अशोक
पक्षी आणि घरटी बनविण्याचे महिने …..
मुनिया: जून ते ऑक्टोबर
सणबर्ड: मार्च ते मे
चष्मेवाला: मार्च ते मे
सातभाई : मार्च ते सप्टेंबर
टेलर बर्ड : एप्रिल ते सप्टेंबर
बनटिंग : एप्रिल ते ऑगस्ट
बुल बुल: फेब्रुवारी ते मे
कोकिळा: एप्रिल ते ऑगस्ट
पहा काही निवडक फोटो
The post वसंतोत्सव : फुलांचा उत्सव ..पक्ष्यांचा किलबिलाट.. फळांचा घमघमाट.. appeared first on पुढारी.