नाशिक : पुढारी वृत्तसेवा – शहर पोलिस आयुक्तालयातंर्गत वाहूतक शाखेत कार्यरत उपनिरीक्षक संतोष खिडे यांना राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मानित करण्यात आले.
मुंबई येथे राजभवनमध्ये गुरुवारी (दि. ६) आयोजित सोहळ्याप्रसंगी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते खिडे यांना पदक प्रदान करण्यात आले. पाेलिस विभागात खिडे यांची ३३ वर्षे सेवा झाली असून आजपर्यंत २७ शेरे (ए प्लस) व २११ बक्षीस त्यांनी पटकाविली आहेत. खिडे यांना सन २०१२ रोजी महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक यांच्याकडून सन्मानचिन्ह देऊन गाैरविण्यात आले. विभागातील गुणवत्तापूर्वक व प्रशंसनीय सेवेबद्दल खिडे यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित केले गेले. या यशाबद्दल पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी व सहकाऱ्यांकडून खिडे यांचे अभिनंदन करण्यात आले.
हेही वाचा: