विभागात नाशिक अव्वल; धुळ्याचा सर्वात कमी निकाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत अर्थात दहावीच्या लेखी परीक्षेचा निकाल सोमवारी (दि.२७) ऑनलाइन जाहीर झाला. नाशिक विभागीय मंडळाचा निकाल यंदा ९५.२८ टक्के लागला. यामध्ये मुलींनी बाजी मारली असून, मुलींचे उत्तीर्ण प्रमाण ९६.४० टक्के एवढे आहे, तर मुलांचे प्रमाण ९३.५८ टक्के एवढे आहे.

इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेसाठी नाशिक विभागातून एक लाख ९७ हजार २३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये एक लाख नऊ हजार २८० मुलांचा, तर ९१ हजार ९१० मुलींचा समावेश होता. त्यातील एक लाख ९५ हजार ५८२ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात लेखी परीक्षा दिली. त्यापैकी तब्बल एक लाख ८६ हजार ३५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णांमध्ये एक लाख १ हजार ३५७ मुले, तर ८७ हजार ९१६ मुलींचा समावेश आहे. विभागामध्ये ८२ हजार ३३० विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत, ६७ हजार ७८२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३० हजार ५६३ द्वितीय श्रेणीत, तर पाच हजार ६७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

दहावीच्या निकालात विभागात नाशिक जिल्हा ९५.२८ टक्क्यांंसह अव्वल ठरला. तर धुळे जिल्हा (९४.०१ टकके) विभागात तळाला गेला. जळगावचा निकाल ९४.५१ टक्के, तर नंदुरबारचा निकाल ९५.१५ टक्के लागला.

विभागनिहाय निकाल (टक्केवारी)

  • पुणे : 96.44 टक्के
  • नागपूर : 94.73 टक्के
  • छत्रपती संभाजीनगर : 95.19 टक्के
  • मुंबई : 95.83 टक्के
  • कोल्हापूर : 97.45 टक्के
  • अमरावती : 95.58 टक्के
  • नाशिक : 95.28 टक्के
  • लातूर : 95.27 टक्के
  • कोकण : 99.01 टक्के

विभागातील निकाल (जिल्हानिहाय)

नाशिक : ९५.२८ टक्के
धुळे : ९४.०१ टक्के
जळगाव : ९४.५१ टक्के
नंदुरबार : ९५.१५ टक्के

तालुकानिहाय निकाल (टक्केवारी)

चांदवड- ९५.१९, दिंडोरी- ९४.७६, देवळा- ९६.९१, इतगपुरी- ९५.५३, कळवण- ९७.२०, मालेगाव- ९५.०४, नाशिक- ९४.३०, निफाड- ९५.६५, नांदगाव- ९२.५०, पेठ- ९६.५५, सुरगाणा- ९७.७८, सटाणा- ९६.२६, सिन्नर- ९६.००, त्र्यंबकेश्वर- ९८.३७, येवला- ९५.५३, मालेगाव मनपा- ९०.०३, नाशिक मनपा-९६.४१

हेही वाचा: