वीज जाताच साधला डाव, ओझरला सव्वा दोन लाखांची घरफोडी

घरफोडी

ओझर पुढारी वृत्तसेवा : येथील एका बंगल्यातील कुटुंब बाहेर गेले असताना व त्याचवेळी विद्युत पुरवठा देखील खंडित झाला असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कडीकोयंडा व सेंटरलाँक तोडून घरात शिरुन घरातील कपाटांतून रोख रकमेसह २ लाख २१ हजार सातशे ४० रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने चोरून नेले असल्याची घटना ओझर येथे घडली.

दि. १९ रोजी सांयकाळी साडेसहा ते रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान दशरथ बाजीराव फटांगळे राहणार अँक्वा पार्क शेजारी माऊली बंगलो जुना सायखेडा रोड ओझर हे कुटुंबियासह जवळच्या नातेवाईकाकडे गेले होते. त्याच दरम्यान ओझर येथील विद्युत पुरवठा काही काळ खंडित झाला होता. ही संधी साधून आज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या तारेच्या कुंपनावरुन उडी मारून कंपाऊण्डनमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मुख्य दरवाजाचे कडीकोयंडा व सेंटरलाँक तोडून बंगल्यात शिरुन लोखंडी व लाकडी कपाटातून १३ हजार रुपये रोख रक्कमेसह सोन्याची लांब पोत, सोन्याचे पॅन्डल, सोन्याचा नेकलेस, मनी मंगळसुत्राची लहान पोत, सोन्याची ठुशी व ३ नग चांदीचे शिक्के (नाणे) असा एकुण २ लाख २१ हजार ७४० रुपयांचा ऐवज चोरून नेला असल्याची तक्रार फंटागळे यांनी काल ओझर पोलिस ठाण्यात नोंदविल्यावरून ओझर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक वाय.व्ही. केंद्रे करत आहे.

पोलीस आहे कुठे?

ओझर व उपनगरात गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोरट्यांनी उच्छाद मांडला असुन शेती संलग्न वस्तु पाईप पाण्याची मोटर यांना हे चोरटे लक्ष्य करत असतांना मात्र पोलीस कुठेच दिसत नसल्याची नागरीकांची ओरड आहे. संध्याकाळच्या वेळेत येथील मुख्य रस्त्यावरून रोडरोमिओं सुसाटपणे दुचाकी चालवत असतात पोलीस याची दखल घेतांना दिसत नसल्याची खंत नागरीक बोलुन दाखवत आहे.

हेही वाचा –