नाशिक : पुढारी वृत्तसेवा
समाजातील विविध घटकांशी नाळ जोडलेल्या ‘पुढारी’ परिवाराच्या वतीने नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या सहकार्याने येत्या शनिवारी (दि.११) सहकार महापरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग असलेल्या या महापरिषदेत फेडरेशनशी संलग्न जिल्ह्यातील निमंत्रित सहकारी पतसंस्थांचा सहभाग राहणार आहे.
महापरिषद शनिवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ च्या दरम्यान नाशिक शहरातील इंदिरानगर येथील हॉटेल एनराइज (सयाजी) येथे आयोजित करण्यात आली आहे. राज्याचे सहकार आयुक्त शैलेश कोतमिरे यांच्या हस्ते महापरिषदेचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर, सहकार विभागाचे माजी सहसंचालक डी. ए. चौगुले, मुंबई विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे, नाशिक विभागीय सहनिबंधक विलास गावडे, नाशिक जिल्हा उपनिबंधक फयाज मुलानी, तालुका उपनिबंधक संदीप जाधव, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे सुशील जाधव, फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट तथा प्रेरणा मल्टिस्टेट अर्बन को. क्रेडिट सोसायटी ( राहुरी) चे अध्यक्ष सुरेश वाबळे, रेणुकामाता को-ऑप. सोसायटी (अहमदनगर) चे अध्यक्ष प्रशांत भालेराव, महेश नागरी मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी (पुणे) चे अध्यक्ष मगराज राठी, गो कॅशलेस इंडियाचे चेअरमन चन्ने, नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
चार महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चासत्र
महापरिषदेत दुपारच्या सत्रात चार महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चासत्र होणार आहे. त्यामध्ये सहकारी संस्थांची उत्पन्नवाढ, उत्कृष्ट संस्था आणि रेकॅार्ड व्यवस्थापन महत्त्व, सहकारी संस्था आणि डिजिटलायझेशनमधील संधी आणि कायदा व ऑडिट यांचा समावेश आहे. या चर्चासत्रांमध्ये सहकार क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांचा सहभाग राहणार आहे.
या मान्यवर पतसंस्थांचा राहणार समावेश
महात्मा फुले नागरी सह. पतसंस्था मर्या, (चांदवड), कल्याणी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित (नाशिक), श्री गजानन महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित (नाशिक), नाशिक रोड नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित (नाशिक रोड), नाशिक जिल्हा महिला व बचतगट विकास सह. पतसंस्था मर्या. (नाशिक), नामको पतसंस्था दि विजय अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. (नाशिक), श्री महारुद्र हनुमान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित (सातपूर), श्री रामराव आहेर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. (देवळा), रघुनाथ हरी अमृतकार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित (गुंजाळनगर, देवळा), जय मल्हार नागरी सहकारी पतसंस्था मर्या (नाशिक), श्री गोवर्धन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित (सोनांवे, सिन्नर), श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित (डुबेरे, सिन्नर), एस. एस. के. धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नायगाव (सिन्नर), जय योगेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. (अक्राळे, दिंडोरी), मारुती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. (ओझर मिग, निफाड), स्व. शांतीलाल सोनी निफाड नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित (निफाड, नाशिक), श्री धनलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. (कळवण, नाशिक), दि सुवर्णा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित (नाशिक), स्व, राजाभाऊ तुंगार ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या (शिंदे, नाशिक), सुदर्शन नागरी सहकारी पतसंस्था मर्या. (नाशिक), गोविंदा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. (मनमाड, मालेगाव).