शिक्षकांच्या आग्रहास्तव अपक्ष उमेदवारी : विवेक कोल्हे

कोल्हे अर्ज दाखल www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्यात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, पहिल्याच दि‌‌वशी कोपरगाव येथील भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी अर्ज सादर केला. अर्ज सादर करतानाच त्यांनी शिक्षकांच्या आग्रहास्तव आपण अपक्ष उमेदवारी करत आहोत, त्यामुळे पक्षाचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगितले आहे.

कोल्हे म्हणाले, मी पक्षासोबत बंडखोरी केलेली नाही. ज्या मतदारसंघाची निवडणूक आहे, तो शिक्षकांच्या अनेक प्रश्नांची निगडीत मतदारसंघ असल्याने इथे राजकीय जोडे बाजूला ठेवून या उमेदवारीकडे बघितले पाहिजे. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सगळे पक्ष मिळून प्रयत्न केले पाहिजे. शिक्षक हा देश घडवणारा महत्त्वाचा घटक आहे. पक्षविरहित उमेदवारी करावी, असा शिक्षकांचा आग्रह होता. त्यामुळे मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणुकीसाठी मी पहिले उमेदवारी अर्ज दाखल केला असून, आता काम करण्यास वेळ मिळेल. मतदानात एक-एक मत आणि एक-एक व्यक्ती महत्त्वाची असते.

भाजपची भूमिका महत्त्वाची ठरणार

विवेक कोल्हे यांच्या मातोश्री कोपरगावच्या माजी आमदार आहेत तसेच मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या माजी सरचिटणीस नीलिमा पवार यादेखील नातेवाईक आहेत. मूळचे भाजपचे असलेले कोल्हे हे पक्षविरहित निवडणूक लढवत असले, तरी भाजपची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान, कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नीलिमा पवारदेखील त्यांच्या समवेत उपस्थित होत्या.

हेही वाचा –