नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क- प्रभू श्री राम हे एक वचनी होते. मग वचन मोडणारे श्रीरामभक्त कसे होऊ शकतात?. श्रीरामांनी वालीचा वध का केला, हे समजून घ्यावे लागेल. आपल्याला देखील वालीचा वध करावा लागेल. त्याने आपली शिवसेना पळविली आहे. शिवसेना पळवणाऱ्या वालीचा वध करणारच असा निर्धार करा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. रामाचे मुखवटे घालून काही रावण फिरत आहेत. प्रभू श्रीराम हे एका पक्षाची मालमत्ता नाही. जर तुम्हाला तसे वाटत असेल तर आम्हाला भाजपमुक्त श्रीराम करावा लागेल असा नारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
शिवसेना ठाकरे गटाचे आज (दि.23) नाशिकमध्ये अधिवेशन होते आहे. यावेळी कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले. ज्या शिवसैनिकांमुळे तुम्ही तिथपर्यंत पोहचले त्यांना तुम्ही विसरलात आणि आज एकटे श्रेय लाटत आहात. अरे, श्रेय घ्या पण निदान श्रीरामचंद्राचा एक तरी गुण तुमच्यात आहे हे तरी कळू द्या. राम की बात हुई अब काम की बात करो. कॉंग्रसेला विचारतात तुम्ही 70 वर्षांत काय केल तुम्ही सांगा तुम्ही 10 वर्षांत काय केलं. पहिल्या पाच वर्ष तर पंतप्रधान आख्ख जग फिरले. त्यांना विचारा ते या काळात एकदा तरी अयोद्धेला गेले का. मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून आम्ही सुद्धा प्रचार केला. शिवसैनिकांमुळे तुम्हाला दिल्ली दिसली. आज आमच्या नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करुन चौकश्या केल्या जात आहेत. उद्या तुमच्या चौकश्या करुन आम्ही तुम्हाला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. मुळात घोटाळ्याची सुरुवातच पीएम केअर फडांपासून झाल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
तर कॉंग्रेसवासी कसे होणार…
कॉंग्रेससोबत गेले म्हणून काँग्रेसवासी झाले अशी टीका आमच्यावर करतात. ३० वर्षे भाजपसोबत होतो तरी निर्लज्ज भाजपवासी झालो नाही. तर काँग्रेसवासी कसे होणार. श्यामप्रसाद मुखर्जींनी मुस्लिम लीगसोबत सरकार स्थापन केले होते. स्वातंत्र्यलढ्यात आरएसएसने कधीही भाग घेतला नाही. आयते मिळालेले स्वातंत्र्य गिळायला निघाले. स्वांत्र्यलढत्यात लढणारी काँग्रेस नको म्हणून मुस्लिम लीगबरोबर श्यामाप्रसाद मुखर्जींनी सरकार स्थापन केेले होते. त्यांच्याबद्दल बोला. असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
हेही वाचा :
- Mumbai | ३ कर्मचाऱ्यांना लोकलने उडवले, वसई रोड- नायगाव रेल्वे स्टेशनदरम्यान दुर्घटना
- Mizoram News: लेंगपुई विमानतळावर बर्मी लष्कराचे विमान कोसळले
- Israel-Hamas war : इस्रायलचा गाझाच्या खान युनूस शहरावर हल्ला; ६५ पॅलेस्टिनी ठार
The post शिवसेना पळवणाऱ्या वालीचा वध करणार : उद्धव ठाकरे appeared first on पुढारी.