शिवसेनेच्या खांद्यावर भाजपा वाढली हे विसरु नका : संजय सावंत

संजय सावंत, गिरीश महाजन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा –  राज्यात शिवसेनेच्या खांद्यावर भाजपा वाढली. ज्या वेळेस बाळासाहेब ठाकरे होते, त्या काळात 300 वर दोघांचे खासदार गेले होते. त्यामुळे कोणाचे किती खासदार कोणामुळे निवडून आले याचा अभ्यास गिरीश महाजन यांनी करावा असा सल्ला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते संजय सावंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये गिरीश महाजन यांना दिला.

आज सायंकाळी एका हॉटेलमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते संजय सावंत यांनी गिरीश महाजन यांना प्रत्युत्तर दिले. म्हणाले, आम्हाला शक्तिप्रदर्शन करायचे गरज नसते. याउलट त्यांना अभ्यास करावा लागतो. त्यानंतर शक्तिप्रदर्शन करावे लागते. सध्याला गिरीश महाजन हे गुरुजींच्या भूमिकेत आहे. म्हणूनच ते पाठशाळा विसरले होते म्हणून आता त्यांच्या नगरसेवकांसाठी पाठशाळा सुरू केल्याचा टोला त्यांनी लगावला.

भाजपा सोबत असताना शिवसेनेचे 15 खासदार व 55 आमदार निवडून आले या गिरीश महाजन यांच्या वक्तव्याला विरोध करताना संजय सावंत म्हणाले की, गिरीश महाजन हे विसरले आहेत की भाजपासोबत शिवसेना होती. बाळासाहेब ठाकरे होते म्हणूनच दोघांचे खासदार तीनशेच्या वर निवडून आले होते. शिवसेनेच्या खांद्यावर बसून महाराष्ट्रात भाजपा वाढली आहे हे त्यांनी विसरता कामा नये. बाळासाहेबांमुळे भाजप वाढलेली आहे. त्यामुळे आमचे किती व त्यांचे किती यावर गिरीश महाजन यांनी अभ्यास करून बोलावे असा टोला संजय सावंत यांनी लगावला.

हेही वाचा –

The post शिवसेनेच्या खांद्यावर भाजपा वाढली हे विसरु नका : संजय सावंत appeared first on पुढारी.