वणी : नाशिक पुढारी वृत्तसेवा – सप्तशृंग गडावर जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलला सोमवार (दि.२०) रोजी आठ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने जळुन खाक झाली आहे. बस गडावर जात असतांना बस मधून बचानक धूर येऊ लागल्याने वाहनचालकाने प्रसंगावधान राखून बस थांबवली. त्यानंतर बस मधील प्रवाशांना बसमधून सुखरूप खाली उतरवीले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. यामध्ये कोणतीही जिवितहानी झालेली नसून बस मात्र पूर्ण जळून खाक झाली आहे. याबाबत माहिती कळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत सर्वतोपरी मदतकार्य केले. पाण्याच्या टँकर आणून आग विझवण्यात यश आल आहे. सप्तशृंगी गडावरील नागरिकांनी तातडीने धाव घेतल्याने वेळीच आग विझवण्यात यश आले आहे. उष्णता अधिक असल्याने वाहनातील वायरच्या बिघाडामुळे बस जळाली असल्याचे सांगण्यात येत आहे. यामधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले असून आपत्ती व्यवस्थापन पथक, ट्रस्ट, रोपवे कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला आहे. यामध्ये दोन चालक, दहा महिला, नऊ पुरुष असे एकूण २१ प्रवासी वाहनात होते.
हेही वाचा: