वावी (सिन्नर) पुढारी वृत्तसेवा – सिन्नर तालुक्यातील वावी हद्दीतून जाणाऱ्या समृद्धी महामार्ग खंबाळे शिवारात रविवार (दि. 5) रात्री नऊ वाजेच्या दरम्यान समृद्धी महामार्ग वाहतूक नियंत्रण पथकाकडून गांजा तस्करीचे रॅकेट उद्दवस्त करण्यात आले आहे. तब्बल 32 लाखांचा गांजा या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. याबाबत वावी पोलिसांशी संपर्क साधून गुन्हा दाखल केला आहे.
समृद्धी महामार्गावर वाहतूक नियंत्रण पथक गस्त घालत असताना वाहतूक नियंत्रक अधिकारी आकाश सानप व ज्ञानेश्वर हेंबाडे हे PSI चव्हाणके यांच्यासह गस्त घालत असताना ठीक रात्री नऊच्या दरम्यान खंबाळे शिवारात गाड्यांची क्रॉसिंग सुरु असल्याचे दिसून आले. विचारपूस करण्यासाठी गस्त पथकाची गाडी थांबवली असता गाडीतली सर्व जण अंधाराचा फायदा घेत पळून गेले. सर्व काही संशयास्पद वाटल्यामुळे गाडीची पाहणी केली असता गाडीत अमली पदार्थ (गांजा ) असल्याचे स्पष्ट झाले. याची माहिती प्रभारी अधिकारी मिलिंद सरवदे यांना कळवण्यात आली असता त्यांनी वावी पोलीस स्टेशनला खबर देण्यात आली. वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. नागपूरकडून मुंबईच्या दिशेने जाणारा आयशर राखाडी कलर क्रमांक जी जे २३ ए टी८३२५ मुंबईच्या दिशेने जात असताना खंबाळे शिवारात छोटा हत्ती क्रमांक mh 05 fj-0539 या वाहनातून क्रॉसिंग करून मग पार्सल करून मुंबईच्या दिशेने अथवा परिसरातच विक्रीसाठी येणार होता की काय असा संशय गस्त पथकाला आला होता. कारण दोनच दिवसापूर्वी नांदूर शिंगोटे परिसरात तब्बल साडेचार किलो गांजा जप्त करून वावी पोलिसांनी कारवाई केली होती.
वरील कारवाईत व्हावी पोलिसांनी आयशर ट्रकसह छोटा हत्ती यांच्यासह अमली पदार्थ गांजा मालाचे मोजमाप केले असता सुमारे दोन क्विंटल 10 किलो भरले. पोलीसांच्या सांगण्यानुसार मालाची किंमत 32 लाख व जप्त करण्यात आलेल्या दोन्ही गाड्यांची किंमत 15 लाख आहे. एकुण 47 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल वावी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील कारवाई वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, पोलीस उपनिरीक्षक पारस वाघमोडे बाळासाहेब आहेर करत आहेत.
हेही वाचा –