साक्री नगरपंचायतच्या प्रशासकीय इमारत कामाचा लवकरच शुभारंभ

साक्री www.pudhari.news

पिंपळनेर(धुळे) पुढारी वृत्तसेवा- साक्री नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. भूमिपूजन लवकरच आमदार मंजुळा गावित, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते होणार आहे.

या संदर्भात साक्री नगरपंचायतीचे गटनेते सुमित नागरे यांनी सांगितले की, सदर इमारतीच्या जागा हस्तांतरण पासून ते बांधकामासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. त्यासाठी माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर नागरे व माजी नगराध्यक्ष अरविंद भोसले यांनी आमदार मंजुळा गावित, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडे पाठपुरावा सुरु ठेवला होता.

यावेळी साक्री नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते पंकज मराठे, नगरसेवक राहुल भोसले, नगरसेवक दयानंद मराठे, साक्री नगरपंचायती माजी सभापती गणेश सूर्यवंशी, माजी नगरसेवक बाळा शिंदे, लाडशाखीय वाणी समाजाचे अध्यक्ष प्रमोद येवले, भटक्या विमुक्त हक्क परिषदेचे नाशिक विभागीय संघटक अशोकगिरी महाराज, केतन खैरनार, नासिर शेख, मनोज रामोळे, गोटू जगताप, अतुल जाधव, गणेश सोनवणे, प्रमोद नागरे, नितीन हिरे, संदीप भामरे, देवा पवार, भूषण नागरे, गोकुळ मासुळे, सागर मांडोळे, साजिद तांबोळी, विकी बाबर आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post साक्री नगरपंचायतच्या प्रशासकीय इमारत कामाचा लवकरच शुभारंभ appeared first on पुढारी.