सुरगाणा : पुढारी वृत्तसेवा
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सुरगाणा येथे ओजीटी सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युट समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. समारंभात विविध प्रशिक्षणार्थींना एचएल, ओजीटी व फॉर्च्यूनर कंपनी नाशिक यांच्या मार्फत विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी मिग ओझर येथील एच.ए.एल.चे डीजीएम आणि ट्रेनिंग डिपार्टमेंटचे संजय सावरकर, आशुतोष चांदोरकर, भूषण पवार तसेच टाटा स्ट्राइक प्रोजेक्ट फाॅर्च्यून कंपनी नाशिकचे शरद कदम उपस्थित होते.
समारंभप्रसंगी विविध प्रशिक्षणार्थींना एचएल, ओजीटी व फॉर्च्यूनर कंपनी नाशिक यांच्या मार्फत विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर प्रशिक्षण सत्राचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, डिपार्टमेंट आणि इतर डिपार्टमेंटची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच कंपनीमध्ये निर्माण होणारे एअरक्राफ्ट व त्याचे विविध पार्टस जसे की त्यामध्ये कंट्रोलिंग सिस्टीम, सेंसर, रडार, कम्युनिकेशन सिस्टम, इंडस्ट्री 4.0 बद्द्लची महिती व इतर भागांची माहिती विद्यार्थ्यांनी समजावून घेतली. विद्यार्थ्यांनी थेअरी व प्रात्यक्षिकेबाबतची माहिती व अहवाल समारंभांमध्ये उदाहरणादाखल सादर केला. तसेच पुढील भविष्य हे डेव्हलपमेंट आणि इनोवेशन तसेच आयटीआय आणि कंपनी यामध्ये असणारे डिफरन्स समजावून सांगण्यात आला. विद्यार्थ्यांनी सादर केलेला अहवालावर मान्यवरांनी कौतुकाची थाप दिली. प्रशिक्षणार्थ्यांनी केलेल्या प्रयत्नांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. संस्थेचे प्राचार्य प्रशांत बडगुजर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी संस्थेचे गट निदेशक, आशिष काळे, भांडारपाल अमर काळे, शिल्प निदेशक दीपक जगताप, प्रविण सांगळे, कैलास चव्हाण, प्रणाली ह्याळीज, परिचर संजय गायकवाड, मनोज चौधरी, लीलाबाई चौधरी यांसह संस्थेतील सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
The post सुरगाणामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ओजीटी प्रमाणपत्राचे वितरण appeared first on पुढारी.