नाशिक, पुढारी ऑनलाइन डेस्क- कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी दाखले देण्याची मनोज जरांगे – पाटील यांची मागणी सरकारने मान्य केली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांचे उपोषण आणि मराठा आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी याला विरोध दर्शवला आहे. जरांगेना मिळालेली प्रत हा काही अध्यादेश नाही, केवळ ड्राफ्ट आहे, नोटिफिकेशनचा मसुदा आहे. यावर आम्ही समता परिषदेच्या माध्यमातून हरकती घेणार असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. (Chhagan Bhujbal On Maratha Aarakshan)
मराठा समाजाला त्यांचा विजय झाला असे वाटत असेल मात्र तसे बिल्कुल नाही. याऊलट EWS मधून मिळणारे 10 टक्के आरक्षण व उर्वरीत 40 टक्के असे 50 टक्के आरक्षण मराठे गमावून बसले आहेत. आता 17 टक्के जे शिल्लक आरक्षण आहे. त्यातील 374 जातींसोबत मराठा समाजास झगडावे लागणार असल्याचे भुजबळ म्हणाले. मराठा समाजाचा नेत्यांनी यावर नीट विचार करावा, ते आधी समुद्रात पोहत होते, आता विहीरीत पोहणार असल्याची टीका भुजबळ यांनी केली. Chhagan Bhujbal On Maratha Aarakshan
ओबीसींवर अन्याय की मराठ्यांना फसवलं जातय….
जात ही जन्माने येते ती एखाद्याच्या शपथ पत्राने येत नाही किंवा एखाद्याच्या अफेडिव्हीट ने जात बदलता येत नाही. जात-जन्माने माणसाला मिळत असते. पत्र देऊन जात बदलत असेल तर उद्या दलित, आदिवासी सगळ्यांचेच आरक्षण धोक्यात येईल. नियमाप्रमाणे दलित आदिवासी यांच्यातही कुणीही घुसेल. त्यामुळे ओबीसींवर अन्याय केला जातोय की, मराठ्यांना फसवलं जातय याचा अभ्यास करावा लागेल. (Chhagan Bhujbal On Maratha Aarakshan)
ओबीसींच्या हरकती सरकारकडे पाठवणार
भुजबळ पुढे म्हणाले, कायद्याच्या कसोटीवर हा अध्यादेश टिकणार नाही. त्यामुळे समता परिषदेच्या माध्यमातून १६ फेब्रुवारीपर्यंत ओबीसी समाजाकडून हरकती मागवल्या आहेत. ओबीसींच्या या हरकती सरकारकडे पाठवणार असल्याचे देखील छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.
घरं जाळली, पोलिसांवर हल्ले गुन्हे कसे मागे घेणार?
आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या असे सांगतात. आहो ज्यांनी लोकांची घरं जाळली, पोलिसांवर हल्ले केले. त्यांचे गुन्हे असेच कसे मागे घेणार. मग उद्या हा नियम सगळ्यांना लागू होईल. कुणीही अशा मागण्यांसाठी घरे जाळतील, पोलिसांना मारहाण करतील. असा प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.
हेही वाचा :
- ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपट यादिवशी येणार भेटीला
- Jalgaon News : तमाशा पाहून घरी परतत असताना भीषण अपघात, दोघांचा मृत्यू
The post 'हा' अध्यादेश नाही, फक्त मसुदा, आम्ही हरकती घेणार appeared first on पुढारी.