अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी साकारला जलदुर्ग किल्ला

सुरगाणा (जि. नाशिक)-एरव्ही आदिवासी भागातील शालेय विद्यार्थी हे सुट्टीच्या दिवसात हातात गलोल घेऊन जंगलात पाखरे शोधण्यासाठी जातात तर कधी चिंचा, बोरे गोळा करणे, गुरेढोरे, शेळ्या मेंढ्या वाळणे, नदी नाल्यात हिंडणे, शेती कामात पालकांना मदत करणे हि कामे करतात. मात्र याच रिकाम्या हातांना गुंतवून ठेवत पिंपळसोंड शाळेतील उपक्रमशील शिक्षक प्रविण पवार यांनी शिव जयंती निमित्ताने जलदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात मग्न केले.

याच चिमुकल्यांच्या हातांनी सुंदर अशी जलदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. तालुक्यातील अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळा पिंपळसोंड शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षक प्रविण पवार यांच्या संकल्पनेतून विटा, चुना, दगड, वाळू, माती, गायीचे शेण वापरून पर्यावरण पूरक असा जलदुर्ग किल्ला शाळेत उपक्रमाच्या माध्यमातून उभारुन रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन केले आहे.

जयंती निमित्त शाळेतील विद्यार्थी कृषाली रेंजर, आशिष खाडम, मीनाक्षी कडाळी, नितीन कुवर, हर्षद बागुल, योगेंद्र खोटरे या सर्वांनी मिळून शिक्षक प्रविण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मातीचा जलदुर्ग तयार केला आहे. हा किल्ला बघण्यासाठी गावातील लोकांनी हजेरी लावली. काहींनी आज पर्यंत केवळ चित्रात किंवा सिनेमात गड, किल्ले बघितले होते. जलदुर्ग किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती शाळेत उभारण्यात आल्याने पालक, नागरिकांनी शाळेत येऊन मुलांचे खूप कौतुक केले. शिवजयंती निमित्ताने शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र भोये, प्रविण पवार शाळेतील सर्व विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा नंदा बागुल, ग्राम पंचायत सदस्या उषा खोटरे, तुळशीराम खोटरे, सोन्या बागुल, शंकर चौधरी, रत्ना बागुल, दिनेश बागुल, रतन चौधरी, पोलीस पाटील रतन खोटरे आदी उपस्थित होते.

शिवाजी महाराजांच्या शौर्य गाथा, पराक्रमाचे गड किल्ले हेच खरे साक्षीदार असून त्यांचे जतन व संवर्धन करायला हवे असा छोटासा संदेश विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने जलदुर्ग किल्ला म्हणजे पाण्यात बांधकाम केलेला दुर्ग किल्ला होय. महाराष्ट्रातील अर्नाळा, मुरुड, जंजिरा, अलिबाग हे किल्ले समुद्राच्या किनाऱ्यावर बांधलेले आहेत हाच संदेश या प्रतिकृती च्या माध्यमातून दिला असल्याचे शिक्षक प्रविण पवार यांनी सांगितले.

हेही वाचा

The post अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी साकारला जलदुर्ग किल्ला appeared first on पुढारी.