नाशिकरोडला महिलेचा खून, गोणीमध्ये आढळला मृतदेह

Crime News

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा- नाशिकरोड परिसरातील उपनगर पोलिस ठाणे हद्दीत आज सोमवार (दि.19) एका महिलेचा मृतदेह मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळीच एकलहरे परिसरात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. चोवीस तास होत नाही तोच समोर आलेल्या खूनाच्या दुसऱ्या घटनेने खळबळ उडाली आहे.

परभणी बीड येथील एक महिला बेपत्ता होती. हरवलेल्या महिलेचा उपनगर पोलीस शोध घेत असताना आज अचानक तिचा मृतदेह नाशिक पुणे रोड गुरुद्वारा समोरील एका अर्धवट असलेल्या बांधकाम साइटवर मिळून आला. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या एका डबक्यात गोणी मध्ये या महिलेचा मृतदेह सापडला आहे. उपनगर पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या एल आय सी रोडवर ही महिला हरवली होती.

उपनगर पोलीस ठाण्यात विवाहित सोनाली भानुदास काळे ही महिला हरवल्याबाबत तिच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली होती. घरगुती वादातून ही हत्या झाल्याचे समजते. प्राथमिक दृष्ट्या हरवलेल्या या विवाहितेचा खून झालेला असावा तसेच मृत महिलेच्या नातेवाईकांनी तिचा पती सासू-सासरे, दीर व दिराची बायको हे सतत तिच्या सोबत भांडण करून तिला मारहाण करत होते व यांनीच काहीतरी बरे वाईट केले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या चार जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याबाबत माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.  मृतदेह  शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून अहवाल आल्यानंतरच हत्या आहे की नाही हे समजू शकेल असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा :

The post नाशिकरोडला महिलेचा खून, गोणीमध्ये आढळला मृतदेह appeared first on पुढारी.