आफ्रिकन युवकांचा नाशिकमध्ये धुडगूस, पोलिसांकडून अटक

नाशिक (सातपूर)  : पुढारी वृत्तसेवा

शहरात शिकण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकन युवकांनी येथील पिंपळगाव बहुला परिसरातील जुना जकात नाका परिसरात नाशिकच्या युवकांना मारत रस्त्यावर धुडगूस घातल्याची घटना रविवारी (दि. 18) रात्री 9.30 ला घडली. या प्रकाराने रस्त्यावरील वाहतूक काही वेळ खोळंबली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल ह्याळीज यांची कार (एमएच १५, ईबी ०२८१) त्र्यंबकेश्वर – पिंपळगाव रस्त्यावर उभी होती. त्याचवेळी थॉमस गोमेज (रा. हल्ली मु. महिरावणी, नाशिक व मूळ गिने बिसवू, दक्षिण आफ्रिका) हा मित्राबरोबर दुचाकी क्रमांक एमएच १५, एफएक्स ३८५८ त्र्यंबकेश्वरकडे जाताना ह्याळीज यांच्या कारला मागून धडक दिली. यात दोघांचा शाब्दिक वाद झाला. थॉमसच्या मित्राने ह्याळीज ह्यांना मारहाण केली. तसेच थॉमस व त्याच्या मित्रांनी मद्यपान केल्याचे समजले.

ह्याळीज ह्यांनी सातपूर पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी दारू पिऊन गाडी चालविणे, शिवीगाळ करणे या प्रकरणी गुन्हा दाखल करत संशयितांना अटक केली. सहायक निरीक्षक गवारे अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा : 

The post आफ्रिकन युवकांचा नाशिकमध्ये धुडगूस, पोलिसांकडून अटक appeared first on पुढारी.