कम्युनिटी वर्क फॉर नाशिक मधून पर्यावरण संवर्धनाचा जागर

कम्युनिटी वर्क फॉर नाशिक,www.pudhari.news

नाशिक : नितीन रणशूर

अनेकदा नागरिकांच्या बेफिकीर वागण्यातून ते आपल्या शहरासाठी लहान-मोठ्या समस्या निर्माण करतात. या समस्या प्रत्यक्ष कृतीतून सोडविण्यासाठी लोकसहभागाची गरज असते. हीच बाब हेरून आपलं पर्यावरण संस्थेने कम्युनिटी वर्क फॉर नाशिक हा उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा जागर करत आहे. संपूर्ण शहर प्लास्टिक मुक्तीसह स्वच्छतेसाठी नाशिककर सरसावले. (World Environment Day)

सामाजिक बांधिलकी जपत प्रत्येक सुजाण नागरिक म्हणून आपले काही कर्तव्य आहे, हे लक्षात घेऊन शहरासाठी योगदान देण्याची गरज आहे. त्यासाठी आपलं पर्यावरण संस्थेचे पर्यावरणप्रेमी शेखर गायकवाड यांनी सोशल मीडियावरून कम्युनिटी वर्क ही संकल्पना मांडली. त्यांनी व्हॉट्सअॅपच्या विविध ग्रुपचा वापर करत नागरिकांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला नाशिककरांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. दिवसागणिक सहभागी नागरिकांच्या संख्येत वाढ होत आहे.

प्रत्येक महिन्यात दुसऱ्या व चौथ्या रविवारी सकाळी ७ ते ८ असे प्रत्येकी एक तास परिसरात नाशिककर श्रमदान ले करतात. श्रमदानातून परिसर स्वच्छता आणि प्लास्टिक संकलन केले जाते. ज मोकळे भूखंड, उद्याने, समाज मंदिरे, ग मंदिर, व्यायामशाळा, अभ्यासिका ड यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा गोळा केला जातो. तसेच मोकळ्या जागा जेथे कचरा टाकला जातो. त्याठिकाणी असलेल्या झाडांना पाणी देण्यासह आळे करून खोडांना चुना व गेरूने रंगविण्यात येते. संकलित कचरा महापालिकेच्या 5 घंटागाडीत टाकला जातो. (World Environment Day)

सोशल मीडियातील जनजागृतीमुळे वाढता प्रतिसाद

स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिकसाठी आपलं पर्यावरण संस्थेने सोशल मीडियाच्या माध्यमातून नाशिककरांना साद घातली. कम्युनिटी वर्क फॉर नाशिक या उपक्रमात नाशिक सहभागी होत आहे. ते स्वच्छता आणि प्लास्टिक संकलनाचे व्हिडिओ, फोटो व्हॉट्सअॅपला स्टेटस व फेसबुक, इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत आपले नाशिक आपण स्वच्छ ठेवूया असे घोषवाक्यही लिहून जनजागृती करत सहभागी होण्याचे आवाहन करतात. (World Environment Day)

प्लास्टिक निर्मूलन है काम आपल्या ‘कम्युनिटी वर्क फॉर नाशिक’ या उपक्रमाचा श्रीगणेशा आहे. टप्प्याटप्प्याने पुढे चालत जाऊन आपल्याला शहरासाठी सामूहिक श्रमदानातून – काही छान गोष्टी घडवून आणण्याचे नियोजन आहे. नाशिककरांना क्वॉलिटी सिटिझन ऑफ क्वॉलिटी सिटी हा टप्पा गाठायचा आहे.

– शेखर गायकवाड, पर्यावरणप्रेमी (आपलं पर्यावरण)

हेही वाचा :

The post कम्युनिटी वर्क फॉर नाशिक मधून पर्यावरण संवर्धनाचा जागर appeared first on पुढारी.