कसारा घाटात बर्निंग कारचा थरार

कसारा घाटात कार पेटली,www.pudhari.news

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा- मुंबई आग्रा महामार्गावरील कसारा घाटात मुंबईहुन नाशिकच्या दिशेने येत असताना जुन्या कसारा घाटात घाट चढून आल्यावर कसारा घाटातील टोप बावडी जवळ महिंद्रा XUV कार (क्रमांक MH 04 HF 3641) ने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान चालकाने प्रसंगावधान राखत गाडी बाजूला उभी करून गाडीतील सर्व प्रवाशांना बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली.

या घटनेमुळे जुना कसारा घाटातील वाहतुक एक तासापासून खबरदारीचा उपाय म्हणून बंद करून ही वाहतुक नवीन कसारा घाटातून वळविण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस केंद्र घोटी, रूट पेट्रोलिंग टीम, इगतपुरी नगरपरिषदेचे अग्निशमन दल, टोल नाक्याचे अग्निशमन दल, महिंद्रा अँड महिंद्राचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणण्यात आल्या नंतर एक तासाने पुन्हा जुन्या कसारा घाटातून वाहतुक सुरु करण्यात आली.

हेही वाचा :

The post कसारा घाटात बर्निंग कारचा थरार appeared first on पुढारी.