काँग्रेसने धुळे बाजार समिती ओरबडून खाल्ली : डॉ. सुभाष भामरे

धुळे; पुढारी वृत्तसेवा: धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत वर्षानुवर्ष शेतकरी नाडला जात आहे. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून बाजार समितीत विविध योजना राबविण्यासाठी आम्ही बांधील आहोत. वर्षानुवर्ष आपल्याला ओरबडणार्‍यांच्या पाठिशी उभे राहायचे की बाजार समितीचा लौकीतार्थ वाढविण्यासाठी प्रयत्नशील असणार्‍यांच्या बरोबर रहायचे, हे ठरविण्याची वेळ आता आली आहे. आपल्याला सर्वांच्या सहकार्यातून धुळे बाजार समितीला आदर्श मार्केट कमिटी म्हणून नावलौकीक मिळवायचा आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले.

भाजपा व बाळासाहेब भदाणे मित्र परिवार यांनी धुळे बाजार समिती निवडणूक एकत्रितरित्या लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या युतीच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन भामरे यांनी केले. भाजपाचे प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा यांनी आमदार कुणाल पाटील यांच्या कार्यपध्दतीवर थेट टीका करत त्यांनी सहकारी संस्था डबघाईस आणल्या, असा आरोप केला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि. प. अध्यक्ष सुभाष देवरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, बोरकुंडचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे, जि.प.सदस्य प्रभाकर पाटील, माजी कृषी सभापती प्रा. अरविंद जाधव, माजी जि.प.अध्यक्ष मनोहर भदाणे, जि.प.सदस्य राम भदाणे, भाजपाचे राष्टीय प्रवक्ते संजय शर्मा, माजी कृषी सभापती बापू खलाणे, भाजपचे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, संग्राम पाटील, डॉ. आशिष पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

The post काँग्रेसने धुळे बाजार समिती ओरबडून खाल्ली : डॉ. सुभाष भामरे appeared first on पुढारी.