कांदा अनुदान अर्जासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

कांदा उत्पादक,www.pudhari.news

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

अवकाळी पावसामुळे नुकसानीची झळ पोहचलेल्या कांदा शेतकऱ्यांना अनुदानाचे अर्ज सादर करण्यासाठी असलेली मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढविल्याची माहिती पणन संचालनालयाने आज सर्व जिल्हा उपनिबंधकांना विशेष परपत्रकाव्दारे कळविले आहे.

राज्य शासनाने १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना रूपये ३५० प्रति क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर केलेले आहे. अनुदान मिळणेसाठी संबंधित शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ३ एप्रिल ते २० एप्रिल २०२३ पर्यंत अर्ज सादर करावा, असे पणन संचालकांनी सर्व बाजार समित्यांना कळविले होते. मात्र, राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या सात बारा उताऱ्यावर खरीप हंगामातील कांदा पिकाची नोंद नसल्याने अनेक बाजार समित्यांनी शेतकऱ्यांकडुन अनुदान मागणी अर्ज स्विकारले नाही.

परिणामी अनेक शेतकऱ्यांना कांदा अनुदान अर्ज सादर करणे बाकी राहीलेले आहे. यासंदर्भात शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, कृषि मंत्री अब्दुल सत्तार, पालकमंत्री दादा भुसे, पणन संचालक विनायक कोकरे आदींना यांना निवेदन पाठवून अनुदान अर्ज सादर करण्यास मुदतवाढीची मागणी केली होती. त्यानुसार पणन संचालनालयाने आज सर्व जिल्हा उपनिबंधकांना कांदा अनुदान मागणी अर्ज सादर करण्यास ३० एप्रिल २०२३ पर्यंत मुदतवाढ दिल्याचे कळविले आहे.

हेही वाचा : 

The post कांदा अनुदान अर्जासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ appeared first on पुढारी.