कामगारच निघाला चोर, 30 हजाराच्या वस्तू चोरीला

News

नाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून दुकानातून वस्तू चोरीला जात असल्याची बाब दुकान मालकाच्या निर्दशनास आली असता, अधिक तपास केल्यानंतर कामगारच चोर असल्याची बाब समोर आली आहे. अखेर याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश उमाकांत उदार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या पंचवटी भाजी मार्केट यार्डशॉपिंग सेंटरमधील ‘अॅग्री ट्रेडर्स’ या नावाने असलेल्या दुकानातील वस्तू गेल्या दोन महिन्यांपासून चोरीला जात असल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. दोन महिन्यात तब्बल ३० हजाराच्या वस्तू चोरीला गेल्याने त्यांनी कामगारांची चौकशी केली. तसेच पंचवटी पोलिसांत फिर्याद नोंदवली. दरम्यान, पोलिसांनी प्रशांत अशोक जगता (वय-५५, रा. स्वामी समर्थ केंद्रापुढे, निळवंडी रोड, दिंडोरी) या संशयित कामगाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गर्दीचा फायदा घेत लॅपटाप लंपास

गर्दीचा फायदा घेत ठक्कर बाजार येथून अज्ञात चोरट्याने लॅपटॉप लंपास केला आहे. याप्रकरणी धुळे येथील विपुल श्रीकांत बाम्हाणकर यांनी सरकारवाडा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. धुळे येथून नाशिक येथे कामानिमित्त आलेल्या विपुल ब्राम्हणकर हे ठक्कर बाजार येथे आले असता, अज्ञातांनी त्यांच्या लॅपटॉपची बॅग पळविली. त्यात त्यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड देखील होते. याप्रकरणी पोलिस तपास करीत आहेत.

बांधकाम साहित्य लंपास

संभाजीनगर रस्त्यालगत असलेल्या वरद लक्ष्मी बॅक्वेट हॉल येथे सुरू असलेल्या बांधकाम साइटवरील वस्तू अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. याप्रकरणी अभियंता भानुदास नाना शेळके यांनी आडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, चोरट्यांनी दोन ग्रॅडींग मशीन्स, स्टीलच्या रिंगा, रॉड, द्राक्ष बागाचे अँगल, इलेक्ट्रीक मोटारची केबल, लोखंडी पाइप असा ६५ हजार ९५० रुपये किंमतीचे साहित्य चोरून नेले आहे. याप्रकरणी पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post कामगारच निघाला चोर, 30 हजाराच्या वस्तू चोरीला appeared first on पुढारी.