कोळी समाज उपोषण : 17 दिवसांपासून उपोषण, एकाची प्रकृती खालावली

उपोषण

जळगाव : पुढारी वृत्तसेवा ; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आदिवासी कोळी समाज समन्वय समितीतर्फे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरु आहे. १७ व्या दिवशी एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली आहे. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथक उपोषण कर्त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या १७ दिवसापासूनआदिवासी कोळी समाज समन्वय समितीचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू आहे. या आमरण उपोषण साठी बसलेले नितीन रामचंद्र सपकाळे (वय ३५, रा. अंजाळे ता. यावल) यांची प्रकृती दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास खलवली.दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरु असून अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

कोळी समाजाच्या मागण्यांबाबत जोवर शासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही, तोवर उपोषण सोडणार नाही, असा पवित्रा समाजबांधवांनी घेतला आहे. उपोषण सुरु झाल्यावर काही दिवसांनी प्रकृती खराब झाल्याने उपोषणस्थळीच त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते.

याबाबत वैद्यकीय महाविद्यालयात मध्ये माहिती घेतली असतानितीन रामचंद्र सपकाळे यांच्या विविध चाचण्या सुरू असून सोनोग्राफी एक्सप्रेस व रक्ताच्या चाचण्या घेण्यात आलेल्या त्यांच्यावर अति दक्षता विभागात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे.

हेही वाचा :

The post कोळी समाज उपोषण : 17 दिवसांपासून उपोषण, एकाची प्रकृती खालावली appeared first on पुढारी.