बी-बियाणे विक्रेत्यांतर्फे तीन दिवसांचा बंद

जळगाव: पुढारी वृत्तसेवा; महाराष्ट्र फर्टीलायझर्स पेस्टिसाइड सीड्स डीलर असोसिएशनने राज्य शासनाच्या होणाऱ्या नवीन कायद्याच्या विरोधामध्ये दोन ते तीन नोव्हेंबरदरम्यान तीन दिवसांचा विक्री बंद आंदोलन पुकारले आहे. राज्य शासनाने निर्णय न घेतल्यास एक डिसेंबरपासून राज्यभर बेमुदत फर्टीलायझरची दुकाने बंद आंदोलन करण्यात येतील, असा इशारा राज्याचे अध्यक्ष विनोद तराड यांनी दिला आहे.

राज्यातील किंवा देशातील फर्टीलायझर्स व पेस्टिसाइड सीड्स या दुकानांना केंद्र शासनाचे कायदे लागू आहेत. मात्र महाराष्ट्रात शासनाने प्रास्तावित विधेयकांमध्ये जाचक नियमांचा समावेश केल्याने विक्रेत्यांवर कारवाई होणार आहे. हे पाचही कायदे रद्द करण्यासाठी व त्याचा निषेध म्हणून विक्री केंद्र बंद आंदोलन पुकारले आहे. कृषी विभागाने मान्यताप्राप्त सीलबंद पॅकिंग मधील निविष्ठांच्या दर्जाबाबत कृषी विक्रेत्यांना दोषी धरण्यात येऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र फर्टीलायझर्स पेस्टिसाइड सीड्स डीलर असोसिएशनने केली. यावेळी माफदाचे विनोद तराड, योगेश पाटील, राजेंद्र पाटील हे उपस्थित होते.

हेही वाचा :

The post बी-बियाणे विक्रेत्यांतर्फे तीन दिवसांचा बंद appeared first on पुढारी.