गड-किल्ल्यांच्या संर्वधनासाठी हिंदवी सेनेचे आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला तसेच स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात देऊन त्याचे संर्वधन करावे, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी हिंदवी सेना संघटनेच्या वतीने गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौकात लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिनराजे देवरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. सर्वच राजकीय पक्षांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण केले जाते. राजकीय नेते तसेच सरकारमधील मंत्र्यांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी खरी आत्मीयता व आदर असेल तर शिवनेरी, रायगडसह इतर किल्ले केंद्र सरकारच्या ताब्यातून काढून राज्य सरकारच्या ताब्यात देण्यात यावेत. राज्य सरकारने या किल्ल्यांचे संर्वधन करावे. सद्यस्थितीत आरक्षणांमुळे जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातीधर्मांना एकसमान वागणूक दिली. हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्या धर्तीवर सर्व समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा समान हक्क मिळावा, अशी मागणीदेखील या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.

हेही वाचा :

The post गड-किल्ल्यांच्या संर्वधनासाठी हिंदवी सेनेचे आंदोलन appeared first on पुढारी.