जळगावात केळीला डझनाला विक्रमी ७० रुपये भाव

जळगाव केळी,www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात केळीला विक्रमी भाव देऊनसुद्धा केळी मिळत नसल्याचे चित्र यंदा पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांत केळी पिकावर आलेल्या विविध संकटांच्या मालिकेमधील चक्रीवादळ, गारपीट आणि सीएमव्ही व्हायरसच्या झालेल्या प्रादुर्भावामुळे जळगावमध्ये ७० रुपये डझन इतका विक्रमी भाव देऊनही केळी मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सध्या केळी उत्पादनात मोठी घट आली आहे. तसेच यंदा थंडीचा लांबलेला सिझन केळीसाठी अडचणीचा ठरला आहे. त्यामुळे केळी उत्पादन कमी प्रमाणात होत आहेत. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून केळीच्या दरात वाढ झाली आहे. जळगावमध्ये ७० रुपये डझन इतका विक्रमी भाव देऊनही शेतकरी केळीचा माल पुरवू शकत नाही. पुढील महिन्यात मात्र केळीची मोठी आवक होण्याची चिन्हे आहेत.

शेतकऱ्यांना दिलासा….

केळीची मागणी वाढली असली तरी मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने जळगावच्या केळीला सोन्याचे भाव मिळत आहेत. केळी २२०० रुपये क्विंटल या दराने केळी शेतकऱ्यांकडून खरेदी होत आहे. बाजारात ७० रुपये डझन या दराने केळीची विक्री होत आहे. ७० रुपये देऊनसुद्धा बाजारात दर्जेदार केळी मिळत नसल्याचे चित्र आहे. केळीच्या वाढलेल्या या दरामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा :

The post जळगावात केळीला डझनाला विक्रमी ७० रुपये भाव appeared first on पुढारी.