जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील दोन सराईत गुन्हेगारांना जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत स्थानबध्द केले आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
प्रकाश चंद्रकांत कंजर (३४, खंडेरावनगर जळगाव) व सोनू रामेश्वर पांडे (२८, भुसावळ) अशी स्थानबद्ध झालेल्यांची नावे असून त्यांची अनुक्रमे ठाणे व येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. प्रकाश कंजर हा अवैधरीत्या हातभट्टीची दारू तयार करून त्याची विक्री करीत असल्याने त्याच्यावर आतापर्यंत एकूण ८ गुन्हे दाखल आहेत तर भुसावळातील सोनू पांडे याच्यावर घरफोडी, जबरी चोरी, शिविगाळ करून धमकी देणे असे ६ गुन्हे दाखल होते. पोलीस प्रशासनाने प्रस्ताव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडे सादर केल्यानंतर दोघांविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाईचे आदेश पारीत करण्यात आले आहेत.
हेही वाचा:
- जळगाव : महिलेला ४२ व्या वर्षी मिळाले मातृत्व
- कोल्हापूर : संत बाळूमामाच्या बकऱ्यांच्या तळावर आषाढी यात्रा उत्साहात; हजारो भाविकांची उपस्थिती
- पुणे होणार ईलेक्ट्रीक वाहनांचे हब, बारा हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक
The post जळगावात दोन सराईत गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई appeared first on पुढारी.