जळगाव एसबीआयमध्ये सशस्त्र दरोडा, रोकडसह सोन्याचे दागिने लूटले

जळगाव : एसबीआय दरोडा,www.pudhari.news

जळगाव : शहरात गुन्हेगारांची हिम्मत वाढली आहे. शहरातील स्टेट बँकेच्या कालिका मंदिर भागातील शाखेत भरदिवसा बँकेवर दरोडा पडला. दरोडेखोरांनी शहरातील स्टेट बँकेत घुसून चाकूचा धाक दाखवत लाखो रुपये लुटून नेत पळ काढला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

कालिका माता मंदिर परिसरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या जवळ स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. आज (दि. 1 जून) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास नियमितपणे कारभार सुरु झाला होता. इतक्यात दुचाकीवरून आलेल्या हेल्मेटधारी दोघा तरुणांनी बँकेत घुसून कोयत्याने मॅनेजरवर हल्ला चढवत सुमारे 17 लाखांची रोकड तसेच लाखोंचे सोने लुटल्याची माहिती समोर आली आहे.

या दरोडेखोरांनी शस्त्राच्या व्यवस्थापकाच्या मांडीवर कोयत्याने वार देखील केला. यानंतर कोयत्याचा धाक दाखवत त्यांनी बँकेतील रोकड घेऊन तिथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, एमआयडीचीचे प्रभारी शंकर शेळके आदींनी भेट देऊन पाहणी केली याप्रकरणी पोलिसांनी पथक नियुक्त करून आरोपीच्या शोधासाठी रवाना केली आहेत.

हेही वाचा :

The post जळगाव एसबीआयमध्ये सशस्त्र दरोडा, रोकडसह सोन्याचे दागिने लूटले appeared first on पुढारी.