जळगाव जिल्ह्यात 4 लाख 52 हजारांच्या घरफोडीडी

घरफोडी

जळगाव : शहरात व चाळीसगाव मध्ये दोन घरे फोडून चार लाख 52 हजार रुपयांची घरफोडी अज्ञात चोरट्यानी केली. याप्रकरणी दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात दररोज घरफोड्यांचे सत्र सुरू आहे.  पोलीस घरफोड्या करणाऱ्यांना पकडण्यात अपयशी ठरत  आहे. येत्या काळात नाताळ व जानेवारी महिन्यामध्ये राम जन्मभूमीचा उत्सव असल्याने या जिल्ह्यात सुरू असलेल्या घरफोड्या व मोटरसायकल चोरीचे प्रमाणवार यंत्रणा  अंकुश लावेल का हा प्रश्न उपस्थित होत आहे.

शहरातील रामानंद भागातील प्लॉट नंबर चार अजिंठा कॉलनीच्या मागे पिंप्राळा गुजरात पेट्रोल पंपाच्या समोर राहत असलेल्या डॉक्टर मंदार पंडित यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील एलईडी, चांदीचे नाणे, देव घड्याळ असा एकूण 32 हजार रुपयांचा ऐवज घेऊन ते पसार झाले. याप्रकरणी रामानंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत हे करीत आहे. तर चाळीसगाव शहरातील नवीन नाक्याच्या पुढे हनुमान मंदिर हिरापूर रोड या ठिकाणी विजय प्रल्हाद स्वार यांच्या राहत्या घरातून रोख रक्कम सोन्याचे दागिने मोबाईल असा एकूण चार लाख वीस हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले करीत आहे.

हेही वाचा :

The post जळगाव जिल्ह्यात 4 लाख 52 हजारांच्या घरफोडीडी appeared first on पुढारी.