जळगाव दूध संघासाठी मतदानाला सुरुवात ; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड गाजत असलेल्या जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी मतदानास सकाळपासून प्रारंभ झाला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे विरुद्ध भाजपचे गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोघांपैकी कोण बाजी मारेल याचीच उत्सुकता संपूर्ण जिल्ह्याला लागली आहे.

जिल्हा दूध संघात एकूण 20 जागांसाठी शनिवार, 11 रोजी मतदानाला सकाळी आठ वाजेपासून सुरुवात झाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जळगाव, भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, एरंडोल, फैजपूर, पाचोरा 7 तालुक्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीला 441 जण मतदान करणार आहेत. भुसावळ मतदान केंद्रावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे, भाजपचे आमदार संजय सावकारे यांनी मतदानाचा हक्क बजावला. भुसावळमध्ये एक मतदान केंद्र लावण्यात आले आहे. या केंद्रावर 44 जण मतदान करणार आहेत. निवडणूकीचा दिवस उजाडला असतानाही जळगाव जिल्हा दूध संघाचं राजकारण चांगलचं तापलं आहे. दोन्ही गटाकडील नेत्यांकडून आपला विजय होईल, असा दावा केला जात आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनानंतर

दोन मंत्री, सात आमदार खडसेंच्या विरोधात …
दूध संघ ताब्यात घेण्यासाठी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात रस्सीखेच आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सात आमदार हे एकनाथ खडसे यांच्या विरोधात उभे ठाकले असल्याने एकनाथ खडसे हे एकटे पडल्याचे चित्र दिसत आहे. एकूणच आजपर्यंत कोणत्याही दूध संघाची निवडणूक राजकीय आखाडा बनली नसेल अशी जळगाव दूध संघाची निवडणूक आखाडा बनली आहे. त्यामुळं या निवडणुकीकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.

पालकमंत्र्यांच्या विरोधात महापौरांच्या सासू…
जळगाव दूध संघ निवडणूकीत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात जळगावच्या महापौर जयश्री महाजन यांच्या सासू मालती महाजन या जळगाव तालुक्यातून उमेदवार आहेत. जळगाव शहरातील सत्य वॉलभ मतदान केंद्रावर महापौर जयश्री महाजन यांनी आणि त्यांच्या सासू मालती महाजन यांनी मतदान करून मतदानाचा पहिला हक्क बजावला असल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा :

The post जळगाव दूध संघासाठी मतदानाला सुरुवात ; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला appeared first on पुढारी.