जळगाव : मुक्ताईनगरात बसची विद्यार्थीनीला धडक; सायकलचा चक्काचुर

Road Accidents

जळगाव : सायकलने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीला भरधाव वेगाने येणाऱ्या बसने धडक दिली. यात विद्यार्थिनी जखमी झाल्याची घटना मुक्ताईनगर शहरात स्टेट बँकेजवळ घडली. यात त्या मुलीच्या सायकलीचा चक्काचूर झाला असून विद्यार्थीनी जखमी झाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील ऋतुजा राजेंद्र कोल्हे ही विद्यार्थीनी सायकलने शाळेत जात होती. यावेळी स्टेट बँकेजवळ शेगाव ते नवापूर बस क्रमांक एमएच १४ बीटी ४१० ही वेगाने जात असतांना विद्यार्थिनीला बसने धडक दिली. यात विद्यार्थीनीची सायकल पूर्णपणे चक्काचूर झाली असून ऋतुजा जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रूग्णालात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन ऋतुजाला तात्काळ रूग्णालयात पाठविले.

हेही वाचा :

The post जळगाव : मुक्ताईनगरात बसची विद्यार्थीनीला धडक; सायकलचा चक्काचुर appeared first on पुढारी.