जळगाव: मोटरसायकल चोरटे पोलिसांच्या जाळ्यात; सहा दुचाकींसह दोघांना अटक

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : शहरात गेल्या काही दिवसांपासून मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींवरुन पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या ६ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरासह इतर बाजारपेठ परिसरातून मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. या अनुषंगाने तपास सुरू केला असता, गोपनीय माहितीवरून शुक्रवारी (दि.१४) मध्यरात्री एसएम आयटी कॉलेज परिसरात सापळा रचून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी चोरी केलेल्या ६ दुचाकींची माहिती दिली. पोलिसांनी या दुचाकी हस्तगत केल्या आहेत. पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर निकुंभ करीत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, सहाय्यक फौजदार बशीर तडवी, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय निकुंभ, उमेश भांडारकर, भास्कर ठाकरे, प्रफुल्ल धांडे, पोलीस नाईक किशोर निकुंभ, गजानन बडगुजर, योगेश पाटील, राजकुमार चव्हाण, रतन गीते, तेजस मराठे, योगेश इंदाटे, अमोल ठाकूर यांनी केली.

हेही वाचा 

मालगाडीवर चढताच बसला धक्का, जळगाव रेल्वे स्थानकावर माथेफिरुचा विजेचा शॉक लागून मृत्यू

जळगाव : तापीच्या उगमक्षेत्रात जोरदार पाऊस, हतनूर धरणाचे २४ दरवाजे उघडले

जळगाव : बस अपघातात अमळनेरमधील महिला ठार, १३ प्रवासी जखमी, मदतीसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना

The post जळगाव: मोटरसायकल चोरटे पोलिसांच्या जाळ्यात; सहा दुचाकींसह दोघांना अटक appeared first on पुढारी.