जळगाव : ‘या’ प्रकारामुळे मंत्री अनिल पाटील यांच्यावर टीकेची झोड

जळगाव,www.pudhari.news

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आपल्या गावी अमळनेर येथे त्यांचे आगमन झाले. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अनिल पाटील यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. परंतु, त्यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना रस्त्यावर उभे करण्यात आले होते. या विद्यार्थ्यांकडून मंत्र्यांना मानवंदनाही देण्यात आली. यासाठी सुमारे दीड-दोन तास विद्यार्थ्यांना रस्त्यावरच उन्हात उभे रहावे लागले.

अमळनेर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी अजित पवारांना पाठिंबा देत मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर ते प्रथमच आपल्या गावी गेले असता, कार्यकर्त्यांनी त्यांचे चांगलेच धुमधडाक्यात स्वागत केले. यावेळी आश्रमशाळेच्या सुमारे १०० विद्यार्थ्यांना बोलावून घेत रस्त्याच्या दुतर्फा बसविले. मंत्री अनिल पाटील यांना येण्यास उशिर झाल्याने या चिमुकल्या मुलांना भर उन्हातच तिष्ठत उभे रहावे लागले. राज्य महामार्ग असल्याने मुलांना अपघाताचा धोका होऊ शकतो, एवढा साधा विचारदेखील आयोजकांनी केला नाही.

यावरुन आता मंत्री अनिल पाटील यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागण्याऐवजी राजकीय नेत्याच्या स्वागतासाठी उन्हात उभे केल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : 

The post जळगाव : 'या' प्रकारामुळे मंत्री अनिल पाटील यांच्यावर टीकेची झोड appeared first on पुढारी.