जळगाव : रावेरच्या व्यावसायिकाची फसवणूक; 18 टन केळीची परस्पर विक्री

अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

आग्रा येथे केळी पोहोचवण्यासाठी निघालेल्या ट्रक मालकासह चालकाने इच्छित स्थळी मालाची डिलेव्हरी न करता परस्परच केळी विक्री केली. यावरुन सावद्यातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला पाच लाख 41 हजारांचा चुना लावण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावदा येथील ट्रान्सपोर्ट व्यासायिक शेख शोएब शेख असलम (25) हे केळी खरेदी-विक्रीचे ट्रान्सपोटे व्यावसायीक आहेत. दि. 23 मार्च रोजी रात्री 9 वाजता सावदा गावातून ट्रक (आर.जे.11 जी. ए. 8000) मधून 18 टन 750 किलो वजनाची पाच लाख 41 हजार रुपये किंमतीची केळी आग्रा येथे पोहोचवण्यासाठी ट्रकचालक बल्लू सुंदर कुरेशी (रा. फतेहाबाद) आणि हरीओम जोरावरसिंग (रा. आग्रा, उत्तर प्रदेश) हे निघाले होते. मात्र त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी डिलेव्हरी न करता परस्पर विक्री केली. त्यामुळे आग्रा येथे केळी पोहोचलीच नसल्याने व्यावसायीकाने ट्रकचालक व मालकाशी संपर्क साधला. मात्र, संपर्क होत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर शेख शोएब शेख अस्लम यांनी सावदा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अनवर तडवी हे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:

The post जळगाव : रावेरच्या व्यावसायिकाची फसवणूक; 18 टन केळीची परस्पर विक्री appeared first on पुढारी.