डंके की चोट पे सांगतो मी मराठा, शरद पवार जातीयवादी : तुषार भोसले यांची टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर माझे आडनाव भोसले नसल्याच्या काही पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. जेव्हा मी यामागच्या मास्टरमाइंडचा शोध घेतला तेव्हा एकादशीच्या दिवशी मला शरद पवार हेच मास्टरमाइंड असल्याचे समजले. त्यामुळे मी शरद पवार यांना डंके की चोट पे सांगतो की, मी मराठा आहे, अशा शब्दांत भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टचे खंडन केले. यावेळी त्यांनी शरद पवार हे जातीयवादी असल्याचीही टीका केली.

भोसले आडनावावरून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टबाबतचा त्यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला. भोसले म्हणाले की, ‘आम्ही जे धार्मिक काम सुरू केले आहे. त्याला तुम्ही तात्त्विक विरोध करू शकत नाही, त्यामुळे शस्त्र तुम्ही काढले आहे. मी आज पुरावे आणले आहेत. शाळा सोडल्याचा दाखला आहे. यामध्ये भोसले हे माझे आडनाव असल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. आमच्याच गावचे चिरंजीव रणजित भोसले हे तुमच्या पक्षाचे स्थानिक नेते आहेत. संपूर्ण आमडदे गाव भोसले कुळाचे आहे. त्यामुळे मला आश्चर्य वाटतेय की, शरद पवार खोट्या माहितीच्या आधारे कांगावा करीत आहेत. त्यामुळे माझे पवार यांना आव्हान आहे की, मी भोसले नसल्याचा त्यांनी एक तरी पुरावा द्यावा, अन्यथा माफी मागावी अशी शब्दांत तुषार भाेसले यांनी टीका केली. तसेच शरद पवार कितीही पुराेगामीपणाचा आव आणत असले तरी, ते जातीयवादी असल्याचे स्पष्ट होते. आमच्या धार्मिक कार्याला ते धास्तावले असून, त्यांनी जातीपातीचे राजकारण सुरू केले असल्याचेही भोसले म्हणाले.

हेही वाचा :

The post डंके की चोट पे सांगतो मी मराठा, शरद पवार जातीयवादी : तुषार भोसले यांची टीका appeared first on पुढारी.