डेडलाइन संपल्यावरही नाशिक शहरात खड्डयांची लाइन

घनकर लेन www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिका हद्दीमध्ये स्मार्ट सिटी कंपनी व महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीसह अन्य मोबाइल कंपन्यांकडून ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्ते खोदल्याने नाशिककरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशात महापालिका आयुक्तांनी रस्ते खोदण्यास चार महिने मनाई करताना ३१ मेपर्यंत रस्ते दुरुस्तीचे आदेश दिले होते. परंतु, डेडलाइन संपूनदेखील रस्त्यांवरील खड्डे जैसे थे असल्याने, आयुक्तांच्या आदेशालाच वाटाण्याच्या अक्षदा लावल्या आहेत.

रावसाहेब थोरात रस्ता www.pudhari.news
नाशिक : शहराच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कामांसाठी खोदलेले रस्ते 31 मेपर्यंत पूर्णपणे बुजवून रस्ते पूर्ववत करण्याचा अल्टिमेटम प्रशासनाने देऊनही आजही अशाप्रकारे सुरू असलेले खोदकाम तसेच रस्त्यावर मुरूम-मातीचे ढीग कायम असल्याचे वास्तव यातून दिसून येत आहे. (सर्व छायाचित्रे : हेमंत घोरपडे)

मागील दोन ते अडीच वर्षांपासून रस्त्यांवरील खड्डे खोदले जात असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. शारीरिक त्रासाबरोबरच आर्थिक नुकसानदेखील होत असल्याने रस्ते खोदाई बंद करा, अशी सांगण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे. नागरिकांचा त्रास लक्षात घेता महापालिका आयुक्तांनी ११ मे ही रस्ते खोदण्यासाठी अंतिम मुदत दिली होती, तर ३१ मेस खोदलेले रस्ते दुरुस्त करण्यासाठी मुदत दिली होती. परंतु दोन्ही मुदत संपल्यानंतरही रस्त्यांवरील खोदाईचा सपाटा सुरूच असल्याने, नाशिकच्या चांगल्या रस्त्यांची पुरती दुर्दशा केल्याचे चित्र दिसून येत आहे.

घनकर लेन www.pudhari.news
घनकर लेन www.pudhari.news

वास्तविक, ३१ मेपर्यंत रस्ते दुरुस्त करणे अपेक्षित होते. मात्र, काही रस्त्यांवरील मातीचे ढिगारे आणि खळी उचलण्याचे कष्टदेखील संबंधितांकडून घेतले नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, खोदलेले रस्ते जैसे थे असल्याने नाशिककरांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर लवकरात लवकर रस्त्यांची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

रामवाडी रस्ता www.pudhari.news

या भागातील रस्ते जैसे थे : शहरातील आरके, विनयनगर, दीपालीनगर, इंदिरानगर, वडाळा-पाथर्डी रोड, खडकाळी सिग्नल, गोदाघाट, टाळकुटेश्वर, घनकर लेन, जोशीवाडा, रामवाडी रस्ता, रावसाहेब थोरात सभागृहासमोरील रस्ता खोदलेला असून, अद्यापही याठिकाणची दुरुस्ती केली गेली नसल्याचे चित्र आहे.

हेही वाचा:

The post डेडलाइन संपल्यावरही नाशिक शहरात खड्डयांची लाइन appeared first on पुढारी.