धुळे : नेर शिवारात एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

एटीएम फोडण्याचा प्रयत्न,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

नागपूर सुरत महामार्गावर धुळे तालुक्यातील नेर शिवारात असलेल्या एटीएम तोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही च्या माध्यमातून तपास सुरू करण्यात आला आहे. या एटीएम मध्ये 43 लाख रुपये असल्याची माहिती संबंधितांनी दिली आहे.

धुळे तालुक्यातील नेर शिवारात म्हसदी कडे जाणाऱ्या फाट्यावर एचडीएफसी बँकेचे एटीएम सेंटर आहे. या एटीएम सेंटरचा शटर उचकवून आत मशीन तोडण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार आज सकाळी रखवालदाराच्या निदर्शनास आला. त्यामुळे त्यांनी ही माहिती तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना कळवली. त्यानुसार पोलीस पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले.

पोलीस पथकाने एटीएम सेंटरच्या बाहेर असणाऱ्या सीसीटीव्हीची तपासणी केली असता या फुटेज मध्ये तोंड बांधलेल्या एका व्यक्तीने शटर उचकावून आत प्रवेश केला. यानंतर मशीनची तोडफोड केल्याची बाब निदर्शनास आली आहे. पोलीस पथकाने परिसरात पाहणी केली असून आरोपीला ताब्यात घेण्यासाठीची हालचाल सुरू झाली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे.

हेही वाचा : 

The post धुळे : नेर शिवारात एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न appeared first on पुढारी.